आमदार केरामांच्या पुढाकाराने किनवटमध्ये महारोजगार मेळावा

होतकरू बेरोजगार तरूणांना नोकरीची संधी! किनवट/प्रतिनिधी, दि.16 ः किनवट विधानसभा मतदारसंघातील माहूर किनवट येथील होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुण...


होतकरू बेरोजगार तरूणांना नोकरीची संधी!
किनवट/प्रतिनिधी, दि.16 ः किनवट विधानसभा मतदारसंघातील माहूर किनवट येथील होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचा मार्ग सुखकर करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या सौजन्याने व आमदार भीमराव केला यांच्या पुढाकाराने किनवट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (दि.18) मार्च 2023 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालयातर्फे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांनी दिली आहे. 
    माहूर, किनवट सारख्या आदिवासी बंजारा बहुल दुर्गम डोंगराळ भागातील होतकरू उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न या भागात मागील अनेक वर्षापासून कायम आहे. उपजीविकेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी येथील तरुण तरुणींना शहराचे ठिकाण गाठून जेमतेम मोबदल्यावर मिळेल ते काम करून आपला व आपल्या परिवाराचा पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. विकास कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी खेचून आणतानाच बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्‍नही भेडसावत होता. पार्श्‍वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या श्रीमंगल प्रभात लोढा यांच्यासोबत चर्चा करून मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावे आयोजित करून किनवट-माहूर सारख्या मागासलेल्या भागातील सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगार संदर्भाने निर्माण झालेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न चालवले होते. त्याचीच फलनिश्‍चिती पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आ. भीमराव केराम यांच्या विशेष प्रयत्नाने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नामांकित उद्योग, कंपन्यामध्ये नोकरीची संधी, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप व उद्योजकता साठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा व मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती आदींचे प्रशिक्षण दिले जाणार असून शिवाय राज्यभरातील एकूण 19 नामांकित कंपन्यामध्ये तब्बल एकोणिसशे पन्नास एवढ्या रिक्त जागा किनवट येथील आयोजित मेळाव्यातून भरल्या जाणार आहेत. यारोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालया तर्फे करण्यात येत असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांनी केले आहे. 
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात उद्योगधंदे नसल्याने तरुणावर बेरोजगाराची कुर्‍हाड!
     देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात गाजावाजा करून साजरा केला गेला. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात एकही उद्योग धंदा किंवा कारखाना उभा राहू शकला नसल्याने तरुण युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मतदारसंघामध्ये प्राथमिक सुविधा असणे आवश्यक असले, तरी त्यामुळेच विकास होतो काय, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. बेरोजगार तरुणाच्या रोजगाराची समस्या उग्ररूप धारण करत असतानाच तालुक्यात पहिलीच वेळ आहे की आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group