लोहा,(प्रतिनिधी) अयोध्या येथील राम मंदिर निर्माणासाठी सन १९९२ साली झालेल्या संघर्षात काही रामभक्त हुतात्मा झाले. त्यामध्ये कोठारी ...
लोहा,(प्रतिनिधी)
अयोध्या येथील राम मंदिर निर्माणासाठी सन १९९२ साली झालेल्या संघर्षात काही रामभक्त हुतात्मा झाले. त्यामध्ये कोठारी बंधूच्या बलीदान दिनानिमित विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून देशभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यानुषंगाने लोहा शहरात दि. ३० रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण १०५ रक्तदात्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
सदरील शिबिराचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे मठ मंदिर प्रमुख पुरणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारत तेललवार, कांता बिडवई, बंडू वडजे, युवराज वाघमारे, अविनाश पवार, विनायक कोपनर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी विहिंपचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटील पवार, बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील कल्याणकर, तालुका मंत्री विशाल घंटे, सहमंत्री संतोष पाटील कदम, तालुका उपाध्यक्ष आत्माराम पाटील कदम, शहर मंत्री राजेश बोडके, राजेश पाटील कुटे, कृष्णा पाटील वानखेडे, सदाशिव पाटील कदम, कंटिराम पवार, किरण भालेराव, उद्धव पवार, ज्ञानेश्वर भिसे, गजानन तांबोळे, बाबू पवार, संतोष शेंडगे, सोहन सिंह, गणराज केंद्रे, अशोक राठोड़, चंद्रजीत यादव, निलेश गड्डम, योगेश कल्याणकर, अशोक तोनचिरे, आकाश गव्हाणे, शैलेश चंदेल, राम चींतोले, पवन गुणावत, ओमप्रकाश निळकंटे, संदिप निळकंटे, सखाराम तोंनचीरे, पांडुरंग महाराज आदींनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS