शालेय शिक्षणासमवेत ज्येष्ठ नागरिकांबाबत संवेदना रुजविण्याची आवश्यकता - सहायक आयुक्त तेजस माळवदकर

नांदेड, दि. 28  :- अलीकडच्या काळात विज्ञानाच्या प्रगतीने जीवन जेवढे सुसह्य होत आहे त्याप्रमाणात मानवी संवेदनाची घालमेल अधिक होत आहेत. विभक्त...


नांदेड, दि. 28  :- अलीकडच्या काळात विज्ञानाच्या प्रगतीने जीवन जेवढे सुसह्य होत आहे त्याप्रमाणात मानवी संवेदनाची घालमेल अधिक होत आहेत. विभक्त कुटूंब पध्दतीमुळे जेष्ठाच्या समस्या आणि त्यांची होणारी भावनिक घुसमट दुर्लक्षून चालणार नाही असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मराठवाडा प्रादेशिक विभाग उत्तर फेस्काँमच्या वतीने कुसुम सभागृहात आनंद सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, समाज कल्याण अधिकारी कवी बापू दासरी, फेस्कॉमचे अध्यक्ष अशोक तेरकर, देहांगदान जागृती समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष माधव आटकोरे आदि उपस्थित होते. 


प्रत्येक व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. एकमेकांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ज्या घरात संवेदना अधिक जपल्या जातात त्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान अधिक जबाबदारीने होताना दिसतो. अलीकडच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी वृध्दाश्रमाची वाढणारी संख्या ही असंवेदनशील समाजाचे द्योतक आहे. लहाणपनापासूनच इतरांप्रती आदर करण्याचे संस्कार अधिक जबाबदारीने लहान मुलांवर करावे लागतील, असे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले. नागरिक संघटना व सामाजिक न्याय विभाग संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या विविध उपक्रमाचा त्यांनी गौरव केला. 


दीपप्रज्वलनाने सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. फेस्कॉमचे अध्यक्ष अशोक तेरकर यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमा मागची भूमिका विषद केली. प्रमुख अतिथी हस्ते ज्येष्ठ नागरिक संघटना कार्यसंकल्प विशेषांक 2022 चे विमोचन करण्यात आले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सलग्नता प्राप्त नवीन संघाच्या अध्यक्षांना प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रीय यांनी उपस्थितांना देहदान व अवयवदान प्रतिज्ञा दिली. बापू दासरी समाज कल्याण अधिकारी यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर संचलन केले. या कार्यक्रमात रागिणी जोशी, ब्रम्हानंद कुलकर्णी, प्रसाद जोशी यांनी बहारदार गायनाचा त्यांच्या टीमसह कार्यक्रम सादर केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. पाचंगे यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला. 

00000

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group