नवी मुंबईतील सानपाडा येथील "ज्येष्ठ नागरिक संघ सानपाडा" या संघटनेच्या सर्व ज्येष्ठ नागरिकानी घरुन आणलेल्या दिवाळी गोड फराळाचा आस्वाद २७ ऑक्टोबर २०२२ रोजी विरंगुळा केंन्द्रात सर्वानी एकञ बसुन घेतला. ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोलकर तसेच संघाचे आजी व माजी पदाधिकारी चव्हाण , एकावडे ,शिंदे आणि सहकारी मिञांनी भजन गायिले तर सौ. कुलकर्णी यांनी कविता वाचन केले. या दिवाळी फराळ कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे ४० ते ४५ सभासद ऊपस्थीत होते. सहलीचे अनुभव कथन ,ज्येष्ठांच्या प्रती प्रेम, व संघाचा कार्याचा आदर या भावनातून व्यक्त झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात संघाचे आजी माजी पदाधिकारी आनंदात सहभागी झाले होते. संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांनी संघाच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाविषयी अनुभव सांगून मार्गर्दशन केले. संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोलकर यांच्या हस्ते दिवाळी गोड फराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघाचे माजी पदाधिकारी श्री व सौ पार पिल्लेवार ऊभयतांनी गाणे गावून कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी बळवंत पाटील, विठ्ठल गव्हाणे आणि इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले, नवीन पदाधिकाऱ्यांची ओळख बळवंत पाटील यांनी करुन दिली. संघाचे खजिनदार विष्णूदास मुखेकर यांनी आभार मानले. सर्वानी दिवाळी फराळ कार्यक्रमाची शोभा वाढवल्या बद्दल "धन्यवाद" देवून कार्यक्रमाची सांगता केली.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS