प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली येथे नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक जी श्रिधर यांनी जिल्ह्याचा पदभार घेताच जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात आणून अवैध धंद्यांना आळा बसवणार असल्याचे प्रसारमाध्यमांसी बोलतांना सांगितले. सामान्य कुटूंबातुन असलेले जी श्रिधर यांनी इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर खाजगी नौकरी ही केली. परंतु आई वडिलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी युपिएससी परिक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला आणि पहिल्याच प्रयत्नात आयपीएस होऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. बिड येथे पोलिस अधिक्षक म्हणुन त्यांनी उत्कृष्ट कामगीरी बजावली.एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे. बिड जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी नंतर त्यांनी अकोला येथे पोलिस अधीक्षक म्हणुन जबाबदारी पार पाडत असताना जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी दोन वर्षांत एनपिडीए अंतर्गत 78 गुन्हेगारांवर कारवाई करून गुन्हेगारी संपुष्टात आणली. हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना समुळ नष्ट करण्यासाठी सर्व ठाणेदारांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. तसेच ठाण्याच्या हद्दीत चालणारे अवैध धंदे खपून घेणार नसल्याचा गर्भित इशारा ठाणेदारांना दिला आहे. आगामी उत्सव जयंती, नगर पालिका, जिल्ह्या परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल तत्पर असल्याचेही सांगितले आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही श्रीधर यांनी सांगितले. पोलिस वेल्फेअर साठी काम करणार असल्याचेही नुतन पोलिस अधीक्षक यांनी सांगितले आहे. लोकसेवा, राज्यसेवा परिक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अवैध धंद्यावर कारवाई केल्यानंतर परत त्याच ठिकाणी अवैधधंदा सुरू होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचेही एसपी श्रीधर यांनी सांगितले. मात्र नुतन पोलिस अधीक्षक जी श्रिधर यांच्या समोर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आळा घालण्याचे आवाहन आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून देशी विदेशी दारू दुकाने वेळेच्या आधी उघडत आहेत व उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. सदर वाईन शॉप धारक खुलेआम पुर्ण खेड्या पाड्यात दारू सप्लाय करीत आहेत. याकडे दारूबंदी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तर जिल्ह्यात डुप्लीकेट दारू विक्री जोरात होत असुन यावर आता नुतन पोलिस अधीक्षक श्रीधर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS