कृषिकन्यांचे सुकणी येथे नाविन्यपूर्ण उपक्रम


कृषि महाविद्याल, ङोंगरशेळकी तांङा उदगीर येथील  कृषिच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्षं २०२२-२०२३, मौजे सुकणी येथे विविध उपक्रमाच्या माध्यातून उत्साहात चालू आहे.

हा ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम ङाॅ. ङी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(कृषि), व.न.म.कृ., परभणी, ङाॅ. आर.पी. कदम, विस्तार शिक्षण विभाग, व.न.म.कृ., परभणी आणी कृषि महाविद्यालय लातूरचे कार्यक्रम समन्वयक ङाॅ. व्ही. बी.काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

या माध्यमातून मौजे सुकनी गावात ग्राम चर्चासञ आणी पि.आर.ए. उपक्रमाचे आयोजन केले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चर्चासत्राचे आयोजन केले. या माध्यमातून गावातील सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यानंतर पि.आर.ए उपक्रम घेतला. यामध्ये रांगोळी च्या माध्यमातून गावातील अङचणी, नैसर्गिक स्त्रोत, शेतीखालील क्षेत्र, गावातील आर्थिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, कृषी व्यवस्था आणी शैक्षणिक व्यवस्था इत्यादी विषयक माहिती विविध आकृतीच्या माध्यमातून गावतील लोकांना सविस्तर सांगितली. हा नाविन्यपूर्ण उपक्रम हर्षदा सावळे, स्नेहा वगरे, प्रतिक्षा सूर्यवंशी, सुष्मा वागधरे, श्रव्या तेलुगू इत्यादी कृषिकन्यांनी आयोजीत केला.या उपक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ ए. एम. पाटील, कार्यक्रम समन्वय ङाॅ. एस.एन. वानोळे आणी कार्यक्रम अधिकारी प्रा.पाटील एस. पी. यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी गावातील संरपच आशाताई सोपान कणकुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गंगाराम मुळे सभासद विनोद गोटमुकले. शेतकरी, महीला, प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

टिप्पण्या