गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती पुरस्कार जाहीर.. भरणे,कांबळे,इंगोले, कानिंदे,ढगे,शेख,कोल्हे,चोबे आदींचा समावेश.

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे मान्यवरांना यंदाचे गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती पुरस...


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )


विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे मान्यवरांना यंदाचे


गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पोलिस निरीक्षक भगवान कांबळे, अभि.प्रशांत इंगोले, पञकार उत्तम कानिंदे, रामराव ढगे, मुख्याध्यापक एस.के.चव्हाण,सुनिल भरणे,आम्रपाली रणविर-नरवाडे,सुभाष कोल्हे आदी मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याची माहिती निवड समितीच्यावतीने सुप्रसिद्ध सिनेअभिनेते डाॅ.प्रमोद अंबाळकर, ञिरत्नकुमार भवरे, डाॅ.पि.बी.नामवाड, लक्ष्मणराव मा.भवरे, प्राचार्य प्रतापराव नरवाडे यांनी आज दिली



   स्मृतीशेष गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नांदेड,बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र,सा.वारसदार व सा.वृत्त वारसदार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य एम.पी.भवरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणारे मान्यवरांना एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम रद्द करण्यात आला असून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.



  भवरे गुरुजी यांचे दि.२७ सप्टेंबर २०१० रोजी निधन झाले.विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नरत असलेले विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून ते सुपरिचित होते. शासकीय सेवेत असूनही शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक,धार्मिक आदी क्षेत्रांत सदैव कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन तालुका,जिल्हा स्तरावरील गुरुगौरव तसेच,जिल्हा-राज्य व राष्ट्रीय स्तरावरुनही त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सत्कार्यासाठी वाहून घेतले होते.



त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा जोपासण्यासाठी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त एका कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणारे मान्यवरांना दरवर्षी गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.



यंदा गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती पुरस्कार आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाहीर करण्यात आले आहेत.त्यामध्ये शैक्षणिक- सुनिल नामदेव भरणे (सहशिक्षक,पुर्णा), एस.के.चव्हाण (मुख्याध्यापक, शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, दुधड),सायबन मौलासाब शेख (शिक्षक,रा.पाटोदा (त.ब)),आम्रपाली रणविर-नरवाडे,



पञकारिता- उत्तम कानिंदे (किनवट), रामराव ढगे (वार्ताहर, दै.लोकमत,घुंगराळा),सामाजिक- अभि.प्रशांत इंगोले (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, नांदेड),सुभाष कोल्हे (जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,नांदेड) यांना तर प्रशासकीय सेवेतील



कर्तव्यदक्ष अधिकारी- भगवान कांबळे(पोलिस निरीक्षक,पो.स्टे. हिमायतनगर),आर.सी. राऊत(कृषी अधिकारी, पं.स.नांदेड), आर.आर.चोबे (वनपरिक्षेञ अधिकारी, अप्पारावपेठ),एम.डी. गुरुपवार (वनपरिमंडळ अधिकारी,नरसी) आदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे



पालन करुन या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना लवकरच त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व सा.वारसदार व सा.वृत्त वारसदारचे मुख्य संपादक ञिरत्नकुमार मा.भवरे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,लोकेश कावळे,रोहित कावळे, धम्मानंद येरेकार, किरण वाघमारे,जगन्नाथ नरवाडे,यशवंत थोरात, शेख बाबा आदींनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे दिली आहे.




COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group