केज प्रतिनिधी. :- केज पोलीस स्टेशन हद्दीत धाडसी कार्यवाही करीत बाराशे लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन नष्ट करून देशी दारू असा सुमारे ४० हजार रू. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या बाबतची माहिती अशी की दि. २७ सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशन हद्दतील बोरगाव, नांदूरघाट, हनुमंत पिंप्री, डोणगाव, येवता व केज या ठिकाणी कार्यवाही करून १२२० लिटर दारू बनविण्याचे रसायन, १११ दारू बॉटल्स आणि १७ लिटर हातभट्टीची तयार दारू असा एकूण ४० हजार ४४८ रु. मुद्देमाल ताब्यात घेत दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले.
या प्रकरणी मुंबई दारू बंदी कायद्याचे कलम ६५ ई नुसार कल्याण बापु शिंदे, रुक्मीणबाई बापु शिंदे आणि सुबराव मोतीराम पवार रा. बोरगांव तसेच बालाबाई बबन शिंदे, निलाबाई पोपट शिंदे रा.नांदुरघाट त्याच प्रमाणे सुग्रीव रुपला शिंदे, राजेंद्र लाला शिंदे रा.हनुमंत पिंपरी आणि शारुबाई शिवाजी काळे, उषाबाई भिमा काळे रा. डोणगांव व विकास लिंबाजी निर्मळ रा.येवता आणि रंजना राहुल शिंदे रा.फुलेनगर केज यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
COMMENTS