नायगांव ( प्रतिनिधी )
कृषिमंत्री दादाजी भुसे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मांजरम येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांच्याकडून कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, ज्वारी व इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी पावसाची नोंद झाली असल्या कारणाने सरसकट नुकसान ग्राह्य धरले जावे. असे आपल्या निवेदनात शिंदे नमूद केले असून आता पंचनामांचे घोंगडे भिजत न ठेवता ओला दुष्काळ जाहीर करुन, तात्काळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई सरकारने जाहीर करावी. अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
यावेळी परमेश्वर कत्ते रयत शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष, पांडुरंग शिंदे रयत क्रांती शेतकरी संघटना युवा प्रदेशाध्यक्ष, रवींद्र भिलवंडे तालुका अध्यक्ष शिवसेना, पत्रकार विकास भुरे, शिवाजी शिंदे, माधव गायकवाड, शिवाजी गायकवाड,विश्वनाथ शिंदे, बालाजी मा.पाटील,दत्ता पेरके, परमेश्वर केते,उत्तम कर्णे,व्यंकट शिंदे अनेक शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS