उमरी प्रतिनिधी -शेख आरीफ
उमरी:-जिरोणा येथील स्वंताच्या शेतातील विहिरीत मुलींचा पाय घसरून पडल्याने बुडत असलेल्या मुलीला आईने वाचवण्यासाठी गेले असता मायलेकी विहित बुडून मुत्यूमुखी झाल्याची सदर घटना रविवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली आहे. सदर दोघीचेही मृतदेह विहिरीच्या तळाला गेल्याने गावक-यांनी उशिरा विहिरीच्या बाहेर काढुन शेतातच विहिरीच्या बाजुला अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सरपंच पती दताञय तुपसाखरे यांनी दिले.
जिरोणा ग्राम पंचायत समिती सेवक साहेबराव चुनूकवाड ह्याची मयत पत्नी सौ.सुनंदा साहेबराव चुनूकवाड वय ४० वर्षे ग्राम पंचायत समिती सदस्या,तसेच मुलगी कु.कविता साहेबराव चुनूकवाड वय २० वर्षे आधी मायलेकी स्वंताच्या शेतात काम करीत होते.अचानक विहिरी जवळ गाय गेली ती गाय विहिरीत पडेल म्हणून कु.कविता चुनूकवाड हिने धावत गाय ईला वाचवण्यासाठी गेली असता अचानक गवतावरुन पाय घसरून तीचा तोल गेला ती विहिरीत पडली. हे उघड्या डोळ्यांनी आई सुनंदा चुनूकवाड हिने पहाताच क्षणाचा विलंब न करता मुलीला वाचवण्यासाठी धाऊन विहिरी जवळ गेली पहात विहिरीत ऊडी मारुन मुलीला वाचवण्यासाठी प्रर्यत करत होती परंतु दोघींना ही पोहता येत नसल्याने दोघेही मायलेकी विहित बुडून मुत्यूमुखी झाल्याची घटना रविवारी अंदाजे चार वाजताच्या सुमारास घडली. सदर घटना शेजारी शेतक-यांनी पाहुन जिरोणा गावात धावत येऊन गावात माहिती दिले तेव्हा गावातील नागरिकांनी विहिरीतुन मायलेकीचा मृतदेह बाहेर काढुन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार उशिरा करण्यात आले असल्याचे माहिती डि.जी तुपसाखरे यांनी दिले.जिरोणा गावात शोककळा पसरली आहे.
आता साहेबराव चुनूकवाड यांना एक मुलगा योगेश साहेबराव चुनूकवाड हा बारावीचे शिक्षण घेतो तर मुलगी कु.पुजा साहेबराव चुनूकवाड हि बी.ए.चे शिक्षण घेत आहे. आई व बहिण हिचे निधन झाल्याने मुलगा रडुन रडुन व्याकूळ झाला असुन त्याला उमरी ग्रामीण रुग्णालयत उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे माहिती संतोष ईगलेवाड यांनी दिले.
COMMENTS