धारूर /जगदीश गोरे
धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील बत्तीस वर्षीय महिलेचा शेजा-याने विनयभंग केल्याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण बाबासाहेब मस्के हा वाईट हेतुने पाठलाग करत असुन तो मी शेतात गेल्यावर किंवा एकटीला गाठून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून मला शरीरसुखाची मागणी करत आहे तसेच मला मोबाईल वर बोल नाही तर मी तुझा काटा काढीन मी जीव घेईन अशी धमकी देत असतो गेल्या दोन महिन्यांपूर्वी मी आमचे पिंपरदरा नावाच्या शेतात काम करण्यासाठी एकटी जात असताना त्याने मला एकटीला आडवुन माझा वाईट हेतूने हात धरला व साडीचा पदर ओढुन मला तु खुप आवडतेस मला असे म्हणाला होता तेव्हा मी खूप घाबरली व त्याच्या पासून सुटका करून घेतली तेव्हा त्याने मला ही घटना कोणाला सांगू नको नाहीतर तुझा संसार चालू देणार नाही असे म्हणुन धमकी दिली होती.त्यामुळे आज पर्यंत ही गोष्टी कोणालाही सांगितल्या नव्हत्या तरी दि.24 सप्टेंबर रोजी महिला दुपारी धुणे धुऊन नदी वरून प्रत्येक आसताना घराजवळ राहाणा-या शेजारी नारायण बाबासाहेब मस्के याने एकटीला गाठून माझ्या जवळ आला व मला म्हणाला की मी तुझ्यासाठी खास मोबाईल आणला असुन या मोबाईल वरून येथुन पुढे मला बोलत जा असे म्हणुन तृयाने माझ्या अंगावर मोबाईल फेकुन देऊन तू मला खुप आवडतेस असे म्हणुन माझा हात वाईट हेतुने धरुन लज्जास्पद आसे कृत्य करुन माझा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी नारायण बाबासाहेब मस्के यांच्आ विरुद्ध भारतीय दंड संहिता1860 कलम 354,354A,354D,504 नुसार धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनिता साळवे या करत आहेत.
COMMENTS