नांदेड प्रतिनिधी दिनांक 27
जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून खरीप हंगामातील सर्वच पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कापूस सोयाबीन ज्वारी इतर पिकांना जबर फटका बसला असून मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी-नाले यांना मोठा पूर आला आहे, जिल्ह्यामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा अशी मागणी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीने उडीद मूग या पिकाचे नुकसान केले तर आता सोयाबीन कापूस ज्वारी या पिकाचे प्रचंड मोठा प्रमाणात नुकसान करत आहे, हाताशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल आहे, सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटत आहे, कापसाचे बोंडे सडून जात आहे बुरशीजन्य रोगाची लागण झाल्यामुळे कापूस जाण्याच्या मार्गावर आहे, यामुळे सरसगट नुकसानीचे पंचनामा करून जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा तसेच जिल्ह्यातील प्रलंबित गटशेती पोखरा या योजनांना गती द्यावी अतिवृष्टीमुळे मध्यम व लघु बंधारे फुटून शेतात पाणी साचल्याने शेतजमिनी वाहून गेले आहे त्याचे स्वतंत्र पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी शेततळे ठिबक सिंचन वैयक्तिक लाभाच्या योजना रखडलेल्या अनुदानाचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही यावेळी निवेदनात केली, पिक विमा कंपनीने सरसकट पिक विमा मंजूर करण्यासाठी आपल्या स्तरावर आदेशित करावे अशीही शेवटी निवेदनाद्वारे मागणी भागवत देवसरकर केली आहे.
COMMENTS