( कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा उपक्रम )
केज / प्रतिनिधी.
तालुक्यातील काशीदवाडी येथे जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून महत्व सांगण्यात आले.
शेतातील पिकांच्या वाढिसाठी जिवामृत किती महत्वाचे हे सांगितले. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आळणी येथील कृषि महाविद्यालयाचा विध्यार्थी पवनराजे कदम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना जिवामृत बनविण्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
यावेळी कदम यांनी शासकीय योजना व सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या अनिर्बंध वापरामुळे मातीचे आरोग्य बिघडते. त्यामुळे शेतकऱ्यांना जिवामृताचा वापर करण्याचे आवाहन केले. जिवामृत कसे तयार करावे, त्याचा वापर कसा करावा, जिवामृताचे शेतीला होणारे फायदे याविषयी त्यांनी सविस्तर माहिती सांगितली यावेळी शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS