नायगांव प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील मौजे वंजारवाडी येथे सार्वजनिक स्मशानभूमी असताना सुध्दा मागासवर्गीय लोकाना अंत्यविधीसाठी भटकावे लागते आपली स्मशान भूमी कोणती यांचा अनुभव गावकऱ्यांना नसल्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यानां प्रत्येकवेळी बुचकळ्यात पडावे लागते असाच एक प्रकार दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी घडला आहे
तालुक्यातील वंजारवाडी येथे सार्वजनिक स्मशानभूमी असली तरी ती एका शेतकऱ्याच्या नावावर असल्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत असुन मयत जयवंतबाई रामा गारोळे वय ८५ वर्ष या वृध्द महिलेचे दिनांक २४ सप्टेंबर २०२० रोजी निधन झाले होते परंतु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मागासवर्गीयाची स्मशानभूमी कळत नसल्यामुळे सदरील वृध्द महिलेची अंत्यविधी चार तास खोळंबली आहे
स्मशानभूमीत अंत्यविधी करण्या ऐवजी एका शासकीय रानात करण्याचा प्रयत्न केला असताना त्या गायरान पाट्यातील एका शेतकऱ्यानी त्या महिलेची अंत्यविधी रोखली असल्यामुळे वंजारवाडी येथील गंगाधर दिगांबर पाटील यांच्या सल्याने ग्रामपंचायतचे उपसरपंच साहेबराव पाटील कदम यांनी मनाचा मोठेपणा ठेवून खोळंबलेली अंत्यविधी स्वताच्या मालकी हक्काच्या जागेत मागासवर्गीय लोकाना तात्पुरत्या स्वरूपात अंत्यविधी करण्यासाठी सांगितल्याने चार तास ताटकळलेली महिलेची अंत्यविधी अखेर करण्यात आली आहे
वंजारवाडी येथे सार्वजनिक स्मशानभूमी असल्यास मागासवर्गीय लोकांना अंत्यविधी करण्यासाठी रानोमाळ का ? भटकावे लागते या बाबीचा विचार करुन शासनाने तत्काळ सदरील लोकांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमीची जागा निश्चित करुन द्यावेत असा वाद अनेक गावात असुन गावकऱ्यासह लोकांना ही अंत्यविधी करण्याच्या वेळीच स्मशानभूमीची आठवण येत असते अशा गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे असे सदरील गावकऱ्यांसह नागरिकातुन बोलल्या जात आहे.
COMMENTS