.... राज्यातील नागरिक बंधु आणि मातांनो, विशेषता तरून वर्गातील मुलांनो जगातील मानव जातीवर आलेल संकट आता प्रत्यक्षात घरापर्यंत आलेले आहे .कोरोना व्हायरस महामारी च्या नावाने संपूर्ण जगभर कुप्रसिद्ध झालेल्या या महामारीने आपल्या राज्यामध्ये,देशामध्ये आता पर्यंत हजारो नागरिकांचे बळी घेतले आहेत.लाखो लोकांना हा आजार आतां पर्यन्त झाला आहे, तेव्हा या आजाराशी लढाई लढण्याचा साठी प्रशासनाने दिलेले अस्त्र, शस्त्र ,तोफा आता खऱ्या वापरायला पाहिजे असे विचार महाराष्ट्र राज्य गोसावी समाज भुषण असलेले शामभाऊ गोसावी यांनी व्यक्त केले .
यावेळी शामभाऊ गोसावी यांनी संपूर्ण राज्यातील नागरिकांना आवाहन व विचार मांडताना ते म्हणाले मला असे वाटते . आपल्या गावातील धाडसी नागरिकांनी ही शस्त्र, अस्त्र नसुन कोरोनाशि लढायचे दिव्य अस्त्र आहेत.यात सर्वात मोठी ढाल आहे ते म्हणजे मास्क वापरने ,हात, तोंड स्वच्छ साबन लावून धुने ,सॅनेटायझर चा योग्य वापर करने घरात जाताना चप्पल बाहेर काढने शक्य असेल त्यांनी घराबाहेर हातपाय धुने ,दोन जना मध्ये तीन फुट अंतर ठेवने प्रवास न करने, कामाशिवाय न फिरने, ही यालढाईतील मुख्य अस्त्र, शस्त्र, आणि दिव्य अस्त्र म्हणजे स्वतला लॉक डाउन करने, या लढाईत शत्रू समोर दिसत नाही, अशा न दिसणाऱ्या खुनी विश्वास घातकी, शत्रूशी ही लढाई आहे, आपल्या निरपराध नागरिकांचा बळी या कोरोनाने घेतला आहे अतीशय कडकडीत जनता कर्फु आपन पाळला आहे, यामुळे काही प्रमाणात पेशंट कमी झाले आहेत. पण आता ही अंतीम लढाई सुरू आहे. व्यवहार पूर्व पदावर येतील, पण लक्षात ठेवा तुमचे मास्क तयार ठेवा, स्वच्छते साठी योग्य तिथे सेने टायझर वापरा, दुकानात ग्राहक आले तर त्यांना मास्क असेल तरच प्रवेश द्या, हिंमत दाखवा दोन ग्राहक कमी होतील पण आपला जीव वाचवा.आता कोरोनाने समुह संक्रमनाला सुरवात झाली आहे, पेशंट इतके वाढत आहे की नवीन पेशंटला बेड मिळत नाही, आपला परिवार आपणच वाचवू शकता, शोषल डीसटेंनशन ठेवा, आता कुणीही सरकारी अधिकारी तुम्हाला सांगायला किंवा धाक दाखवयाला येनार नाही . ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना यातील कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून ही लढाई लढून थकले आहेत . तेव्हा माझा रक्षक मीच, असे ब्रीद वाक्य मनात ठाम पणे बाळगा, रस्तावर चौकात, सार्वजनिक ठिकाणी, गाडीवरून थुंकनारे यांना नम्र विनंती त्यांनी कुठेही थुंकू नका रोगराई पसरू देऊ नका, गेल्या काही दिवसातील अंत्यविधी पाहीले मनाचा थरकाप होतो, आपल्या गावात अशी भयानता पाहवत नाही.आपल्या कुणाच्याही परिवारावर अशी वेळ देवाच्या कृपेने येऊ नये अशी प्रार्थना सर्व धार्मिक बांधवांनी करावी. वरील नियमांचे पालन करावेच लागेल. पैसा, संपत्ती ,मँनपावर काहीच कामाला येत नाही .भावांनो अशा या छुप्या शत्रूशि ही लढाई आहे, मित्रांनो मी कुणीही अधिकारी पुरुष नाही. तुमचाच तूमच्यातील सामान्य व्यक्ती आहे , मला माहीत आहे आपल्यातील काही माझ्या या लिखाणाला नावे पण ठेवतील, पण कुणी दुखावले असतील तर क्षमस्व पण आपल्याला आता खरी काळजी घ्यावी लागेल.तेव्हा प्रशासनाने सांगितलेले नियम हे तूमच्या भल्या साठी आहेत.घाबरू नका आजाराचे लक्षणे दिसल्यास सरकारी दवाखान्यात त्वरीत संपर्क साधा ही नम्र विनंती, १) बाधीत परिवार २) कोरोनटीन परिवार, घरात कुठल्याही अडचणी आल्या आणि मदतीला कुणी नसेल तर केव्हाही फोन करा मार्गदर्शना साठी व मदती साठी केव्हाही तयार आहे आपला हितचिंतक मित्र बंधु सर्व धार्मिक बांधवांन साठी आम्ही तयार आहोत असे विचार व नागरिकांना आवाहन शामभाऊ गोसावी मो.9850546744 कोल्हार भगवतीपुर ता राहाता जिल्हा अहमदनगर यांनी केले आहे.
COMMENTS